Pune: दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यातून तरुणीसह दोघांना अटक

Two persons, including a young woman, were arrested from Pune on suspicion of having links with a terrorist organization या दोघांकडेही सध्या कसून चौकशी सुरू आहे. यातून धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एमपीसी न्यूज- दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) यांनी संयुक्त कारवाई करत पुण्यातील येरवडा आणि कोंढवा परिसरातून दोघांना अटक केली. सादिया अन्वर शेख (वय 21, रा. येरवडा) आणि नबील सिद्दिकी खत्री (वय 27, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

दिल्लीतील एनआयएचे पथक रविवारी पुण्यात आले होते. त्यांनी विश्रांतवाडी पोलिसांच्या मदतीने येरवड्यातून सादिया शेख हिला तर कोंढव्यातून नबील खत्री याला अटक केली. सादिया शेख हिला यापूर्वीही दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती.

एनआयए आणि एटीएसने संयुक्तरीत्या कारवाई करीत रविवारी सायंकाळच्या सुमारास या दोघांनाही अटक केली. या दोघांकडेही सध्या कसून चौकशी सुरू आहे. यातून धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.