Pimpri :  दारू प्यायला पैसे न दिल्याने दोघांवर कोयत्याने वार

Two persons were attacked allegedly for not giving money to buy liquor in Pimpri-Chinchwad.

एमपीसी न्यूज – दारू प्यायला पैसे न दिल्याने घरात घुसून दोन जणांवर कोयत्याने वार करत जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी बौद्धनगर पिंपरी येथे घडली.

सचिन शाम खंडागळे (वय 32, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांनी प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवी ठोकळ (वय 35, रा. काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवी याने फिर्यादी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. ते पैसे न दिल्याच्या कारणावरून रवी याने फिर्यादी सचिन यांच्या घरात जबरदस्तीने घुसून त्यांना शिवीगाळ केली. तसेच ‘तू मला दुपारी दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत. तुला आता मी मारून टाकतो. बघतो तुला आता कोण वाचवतो’ असे म्हणून लोखंडी कोयत्याने सचिन यांच्या डोक्यात मारून तसेच सचिन यांचा मामे भाऊ रोहीत त्याच्या पोटावर मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.