Dighi : दोघांना रस्त्यात अडवून मारहाण करून लुटले

Two persons were stopped on the street, beaten and robbed in Dighi, Pimpri-Chinchwad

एमपीसी न्यूज – दोघांना रस्त्यात अडवून मारहाण करत चाकूने वार केले. दोघांच्या खिशातून पैसे काढून घेतले. तसेच त्यांची दुचाकी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 15) दुपारी इंद्रायणीनगर आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर घडली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अविनाश धनवे (रा. आळंदी), ऋषिकेश गडेकर (रा. काळे कॉलनी, देहूफाटा) आणि एक अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बाबासाहेब मिट्टू भड (वय 28, रा. आळंदी देवाची) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दुचाकीवरून येऊन फिर्यादी भड आणि त्यांचा मित्र रमेश चव्हाण यांना इंद्रायणी नदीच्या घाटावरील नवीन बंधाऱ्यावर अडवले. ‘तुम्हाला लय मस्ती आली आहे का, तुम्हाला बघून घेतो’ असे म्हणत भड यांना शिवीगाळ केली.

लाथाबुक्यांनी मारहाण करून भड यांच्या हातावर चाकूने वार करून त्यांच्या खिशातून एक हजार रुपये, भड यांचा मित्र रमेश चव्हाण यांच्या खिशातील दोन हजार आणि दुचाकी असा एकूण 78 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.