Pune : दोन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचा-यांना अटक

एमपीसी न्यूज – खडक पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचा-यांना दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

उमेश दत्तात्रय मानकर, वय 41 वर्षे, पोलीस नाईक/3760,  शरद अर्जुन पवार वय 31 वर्षे पोलीस नाईक /7724, दोघे- नेमणूक खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर, अशी या पोलीस कर्मचा-यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लॅटच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारासंबंधाने खडक पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर 332/18 भादवि कलम 420, 467, 468 , 34 प्रमाणे. या गुन्ह्यामध्ये तक्रारदार व त्यांच्या पत्नीला आरोपी न करण्यासाठी दोघांनी दोन लाखांची लाच मागितली होती. यावर 30 व 31 जानेवारी 2019 रोजी तपासणी करण्यात आली होती. याप्रकरणी एसीबीने दोघांनाही आज रोजी अटक केली. पुढील तपास डीवायएसपी नितीन भोयर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.