Hinjawadi : कारची दुचाकीला धडक दोघे जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला समोरून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार किरकोळ तर दुचाकीवरील अन्य दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात 27 जानेवारी रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास भुगाव रोडवर बावधन येथे घडला.

शुभम भोसले, तेजस कांबळे अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर सर्जेराव बारकू भोसले (वय 30, रा. पौड) हे किरकोळ जखमी झाले आहेत. सर्जेराव यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात कार चालकाचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सर्जेराव त्यांच्या पुतण्या शुभम आणि भाचा तेजस यांच्या सोबत दुचाकीवरून भुगाव रोडवरून जात होते. ते पाटील वाडा हॉटेल समोर आलेले असता भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये सर्जेराव यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. तर शुभम आणि तेजस यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.