Sangvi News : आईला भेटण्यासाठी गेलेल्या दोन बहिणींना मारहाण

एमपीसी न्यूज – आईला भेटण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या दोन बहिणींना भावाची पत्नी आणि भाचीने मारहाण केली. ही घटना अभिनवनगर, जुनी सांगवी येथे घडली.

नीलम बाळ शिंदे (वय 52, रा. औंध पुणे), निशा काटे अशी मारहाण झालेल्या बहिणींची नावे आहेत. याबाबत नीलम शिंदे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भावाची पत्नी अरिता नरेश मसीह (वय 50), भाची नम्रता नरेश मसीह (वय 23, रा. अभिनवनगर, जुनी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची बहीण 18 मे रोजी सायंकाळी त्यांच्या आईला भेटण्यासाठी तिच्या घरी गेल्या. त्यावेळी भावाची पत्नी आरोपी अरीता हिने तुम्ही आईला सांभाळत नाही, आईचा दवाखान्याचा व खाण्यापिण्याचा खर्च करीत नाही असे म्हणत फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला. फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डाव्या खांद्याला फ्रॅक्चर केले. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची बहीण आली असता त्यांनाही धक्का देऊन बाजूला घेऊन हाताने मारहाण केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.