Talegaon Dabhade News : सरस्वती विद्या मंदिरच्या दोन विद्यार्थिनी स्कॉलरशिप परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद यांच्या वतीने 2020 -21 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत तळेगाव दाभाडे येथील सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक विभागाच्या संपदा गोविंद देशपांडे व अनुजा संतोष ठुबे या दोन विद्यार्थिनींनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, अंमलबजावणी अधिकारी अनंत भोपळे, कार्यवाह प्रमोद देशक, खजिनदार सुचित्रा चौधरी, शिक्षण समिती सदस्य डॉ ज्योती चोळकर, सदस्य विश्वास देशपांडे, सुनील आगळे, अनुराधा तापीकर, मुख्याध्यापिका रेखा परदेशी, पर्यवेक्षिका सुरेखा रासकर यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे.

इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.