Crime News : पिंपरी-चिंचवडमध्ये दोन तडीपार गुंडांना कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज – भोसरी व गुंडा विरोधी पथकातील पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत दोन तडीपार गुंडांना लोखंडी कोयत्यासह अटक केली आहे.या दोन्ही कारवाई पोलिसांनी सोमवारी (दि. 8) भोसरीतील देवकरवस्तीजवळ व निगडीतील ओटास्कीमजवळ करण्यात आल्या.

करण कुमार जाधव (वय 25 रा. मोशी) याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. तर निगडी येथून युवराज रतन राजपुरोहीत (वय.24 रा.ओटास्कीम) याला गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिसांनी करण याला 17 फेब्रुवारीपासून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र तरीही तो भोसरी परिसरात असल्याची बातमी पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी करणला अटक केली.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक लोखंडी कोयता व मोबाईल फोन असा दहा हजार रुपयांचा एवज जप्त करण्यात आला. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

गुंडा विरोधी पथकाने युवराज याला ओटास्कीम येथून एका लोखंडी कोयत्यासह अटक केली.त्याला पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून 10 जुलै रोजी दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.