Pune News : बोपदेव घाटात ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन टेम्पोची समोरासमोर धडक

अल्पवयीन चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : बोपदेव घाटात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन टेम्पो ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका अल्पवयीन चालकाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

_MPC_DIR_MPU_II

ओंकार अशोक ओव्हाळ (वय 16) असे मृत्युमुखी पडलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष प्रकाश चाटे (वय 22) यांनी फिर्याद दिली असून कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सोमवारी दुपारच्या सुमारास ओमकार हा छोटा हत्ती टेम्पो घेऊन बोपदेव घाटातून जात होता. या वेळी समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना अशोक ओव्हाळचे नियंत्रण सुटले आणि तो समोरून येणाऱ्या फिर्यादीच्या टेम्पो ला जाऊन धडकला. त्यानंतर ओंकार चा टेम्पो जागेवरच पलटला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर टेम्पोतील इतर दोघे जखमी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.