Pune District Crime News: लुटलेल्या पैशाची डोंगरावर वाटणी करत असताना दोन चोरटे जेरबंद

एमपीसी न्यूज : रस्त्याने भरधाव वेगात जाणाऱ्या हायवा ट्रक ला दुचाकीने अडवून चालकाला मारहाण करत त्याच्या जवळील रोख रक्कम चोरून नेणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत जेरबंद केले. अजय दिगंबर वाघमारे (वय 18) आणि महेश शिवाजी माने (वय 18) अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत मोरे हे हायवा ट्रक मध्ये मुरूम भरून कुंजीरवाडी ते आळंदी म्हातोबा या दिशेने जात होते. त्यावेळी घेऊन आलेल्या दोन तरुणांनी त्यांचा ट्रक अडवला आणि आम्हाला कट का मारला असे म्हणत तलवारीने ट्रकची काच फोडली. तसेच फिर्यादी यांच्या खिशातील दहा हजार रुपये काढून घेऊन गेले.

दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आरोपीची ओळख पटवली आणि आळंदी म्हातोबा गावच्या हद्दीतील एका डोंगरावर चोरीच्या पैशाची वाटणी करणाऱ्या आरोपींना जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून रोख दहा हजार रुपये आणि चार महागडे अँड्रॉइड मोबाईल फोन लोखंडी तलवार जप्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.