Moshi Crime News : पादचारी तरुणाला दोघांनी लुटले

एमपीसी न्यूज – पादचारी तरुणाला दोघांनी शिवीगाळ करत लुटले. तरुणाच्या पाकिटातून रोख रक्कम चोरट्यांनी जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना रविवारी (दि. 19) रात्री बो-हाडेवाडी मोशी येथे घडली.

करणसिंग अमरसिंग यादव (वय 22, रा. बो-हाडेवाडी, मोशी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रथमेश विजय साळवे (रा. संजय गांधीनगर, मोशी), मिलन थापा (रा. जाधववाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यादव रविवारी रात्री बो-हाडेवाडी मोशी येथे पायी चालत जात होते. रात्री आठ वाजताच्या सुमारास यादव त्यांच्या घरासमोर फिरत असताना आरोपींनी जबरदस्तीने यादव यांच्या खिशातून पाकीट काढले आणि तीन हजार रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने काढून चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.