Breaking News : पुणे सातारा महामार्गावर दोन ट्रकची धडक; हायड्रोजन पेरॉक्साइड गॅसची गळती

एमपीसी न्यूज – पुणे सातारा महामार्गावर हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दुसरा ट्रक धडकल्याने हायड्रोजन पेरॉक्साइड गॅस गळती व वाहतूक कोंडी शुक्रवारी सकाळी झाल्याची माहिती पीएमआरडीए नांदेड सिटी अग्निशमन विभागाने दिली आहे. हा अपघात वेळू गावाजवळ कुदळे पेट्रोल पंपासमोर झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सातच्या दरम्यान दोन ट्रक साताऱ्याच्या दिशेने पुणे- सातारा महामार्गावरुन जात होते.एक ट्रक (नंबर TN 34 Z 7729)  हा हायड्रोजन पेरॉक्साईडचे 400 कॅन घेऊन कल्याणहून तमिळनाडूला जात होता.प्रत्येक कॅन 50 लिटरचा होता.औषधे घेऊन जाणारा ट्रक (NL 01 AD 8338)  ने मागून या हायड्रोजन पेरॉक्साईड नेणाऱ्या ट्रकला धडक दिली.त्यामुळे हायड्रोजन डायॉक्साईड गॅस लिक होऊ लागला.

ट्रकचा (NL 01 AD 8338) चालक इम्रान सहिद अली, (वय 22 ) आणि बाबुल मकबूल अहमद सिद्दिकी (वय 25, रा. उत्तर प्रदेश) हे दोघे त्या ट्रकमध्ये होते. दोघे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यांमध्ये पाठवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.