Chakan : चाकणमधून दोन दुचाकी चोरीला

Two two wheelers were stolen from Chakan area.

एमपीसी न्यूज – चाकण परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याबाबत रविवारी (दि. 24) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीतही वाहने चोरीला जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

पहिल्या प्रकरणात रियाज मोहम्मद अहमद (वय 44, रा. रासे फाटा, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 19 मे रोजी दुपारी साडेपाच वाजता चाकण-शिक्रापूर रोडवर वेदांत संकुल समोर उघडकीस आली आहे.

फिर्यादी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा सीडी डीलक्स दुचाकी (एम एच 14 / जी एफ 8255) वेदांत संकुल समोर लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

दुसऱ्या प्रकरणात सुनील सुधाकर जाधव (वय 57, रा. महाराजा हॉटेलच्या मागे, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 21 मे रात्री साडेआठ ते 22 मे सकाळी साडेसात या कालावधीत महाराजा हॉटेलच्या मागे असलेल्या बालाजी क्लासिक या सोसायटीत, चाकण येथे घडली आहे.

फिर्यादी यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची बजाज डिस्कवर दुचाकी (एम एच 14 / सी टी 4687) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.