Chakan : कंपनीसमोर पार्क केलेली दुचाकी लंपास

एमपीसी न्यूज – कंपनीच्या गेटसमोर रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 15) सकाळी सात ते दुपारी साडेतीनच्या सुमारास वोल्क्सवॅगन स्कोडा कंपनी समोर महाळुंगे येथे घडली.

दादासाहेब नामदेव करडे (वय 24, रा. निघोजे, ता. खेड. मूळ रा. बलवडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दादासाहेब महाळुंगे येथील वोल्क्सवॅगन कंपनीत काम करतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे ते कामावर गेले. त्यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची एम एच 45 / डब्ल्यू 1229 ही दुचाकी कंपनीच्या गेटसमोर रस्त्याच्या बाजूला पार्क केली. दुपारी काम संपवून ते कंपनीच्या बाहेर आले असता त्यांची दुचाकी गायब असल्याचे दिसले. त्यांनी सर्वत्र दुचाकींचा शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.