Wakad : गाडी चालवण्याची हौस भागवण्यासाठी दुचाकी चोरणा-या दोघांना अटक

वाकड पोलिसांची कामगिरी; वाहनचोरीचे चार गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – दुचाकी गाडी चालविण्याची हौस भागविण्यासाठी दुचाकी चोरणा-या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 75 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील वाहनचोरीचे चार गुन्हे घडकीस आले आहेत.

मयूर जगन्नाथ साचने (वय 20, रा. गोरा कुंभार कॉलनी, ताथवडे), मेघराज नरसिंग शिंदे (वय 19, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताथवडे मधील रघुनंदन मंगल कार्यालयाजवळ दोन तरुण दुचाकी घेऊन थांबले असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून मयूर आणि मेघराज या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकी बाबत चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांच्याकडे असलेली दुचाकी ही चोरीची असून ताथवडे, वाकड आणि थेरगाव परिसरातून आणखी तीन दुचाकी चोरल्याचे सांगितले.

यावरून त्यांना अटक करून त्यांच्याकडून 75 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दुचाकी गाडी चालविण्याची हौस भागविण्यासाठी दुचाकी चोरत असल्याचेही दोघांनी सांगितले. ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण, पोलीस उपनिरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी विक्रम कुदळ, विजय गंभीरे, बिभीषण कन्हेरकर, बापूसाहेब धुमाळ, अशोक दुधवणे, सुरेश भोसले, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अतुल इंगळे, मधुकर चव्हाण, रमेश गायकवाड, प्रमोद भांडवलकर, विक्रम जगदाळे, सुनील काटे, भैरोबा यादव, सणस, शाम बाबा, नितीन गेंगजे, मधुकर चव्हाण, सागर सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.