Sangvi : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक जखमी

एमपीसी न्यूज – दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकजण जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. १६) सकाळी दहाच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.

विनायक बाळकृष्ण कोतकर (वय 40, रा. पिंपळे निलख), असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अभिषेक कुमार (रा. पिंपळे निलख) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी कोतकर हे आपल्या दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी भरधाव वेगात दुचाकीवरून आलेल्या अभिषेक कुमार याच्या दुचाकीने कोतकर यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये कोतकर यांचा डावा खांदा फॅक्‍चर झाला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.