BNR-HDR-TOP-Mobile

Maval : देहूरोड सेंट्रल चौकात दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड सेंट्रल चौकात दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. 

निकेश अशोक पवार (वय २६, रा. सरस्वती अपार्टमेंट, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे), असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निकेश हा शनिवारी (दि. १६) सकाळी नऊच्या सुमारास मुंबईवरून पुण्याच्या दिशेने भरधाव निघाला होता. दरम्यान, देहूरोड सेंट्रल चौकात त्याचे आपल्या टिव्हीएस आपाचे (क्र. एम एच १४ एच पी ३३१४) गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी डिव्हायडर ओलांडून पलीकडील लेनवरील वेगन-आर या गाडीला जोरदार धडक दिली.

या अपघातात निकेश हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने लोकमान्य हॉस्पिटल निगडी येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3