Kiwale Accident News : किवळे नजीक दोन दुचाकीचा भीषण अपघात, एक जागीच ठार

Two-wheeler crash near Kiwale, one killed on the spot.

एमपीसी न्यूज – मुंबई-बंगळूरु हायवेवर किवळे नजीक दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत तर, एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आज (मंगळवारी) रात्री साडे आठच्या सुमारास हा अपघात झाला.

देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळूरु हायवेवर किवळे नजीक दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे.

एका दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने जोराची धडक दिली. या धडकेत दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे तर, एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी इसमांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.