Chakan Accident : एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – एसटी बसने दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 11) दुपारी साडेबारा वाजता खेड तालुक्यात चिंबळीफाटा कुरुळी येथे घडला.

बाबासाहेब उत्तमराव जाधव (वय 38, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी राकेश बसवराज कांचाल (वय 39, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालक शिवाजी दिनकर सातपुते (वय 51, रा. करनदी, ता. शिरूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर चालक म्हणून काम करतो. नाशिक-पुणे या मार्गावरून बस घेऊन येत असताना त्याने भरधाव वेगात बस चालवली. चिंबळीफाटा कुरुळी येथे बसने बाबासाहेब चालवत असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात बाबासाहेब यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी बस चालक शिवाजी सातपुते याला अटक केली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.