Pune news: भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, अडीच वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू

Two wheeler hit by fast truck, Two & half year child dies on the spot.

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका अडीच वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दुचाकीचालक तरूण आणि एक महिला जखमी झाले आहेत.  तर दोन महिन्याच्या चिमुरड्याला साधे खरचटले देखील नाही. पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील पोलीस स्टेशन जवळील मुख्य चौकात झाला. आदित्य असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की दुचाकीस्वार गौरव मिसाळ हा मावशी आणि दोन मुलांना घेऊन घराकडे निघाला होता. त्याची दुचाकी इंदापूर शहरातील बाबा चौकात आले असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली.

अपघातानंतर दुचाकी ट्रक सोबत 50 फूट अंतरापर्यंत फरफटत गेली. यादरम्यान ट्रकचे चाक आदित्य त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रक चालक वैभव दत्तात्रय डोके याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. हा अपघात मुख्य चौकात झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.