Chakan : बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या बसने एका दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 30) सकाळी साडेआठ वाजता वॉल्क्सवॅगन कंपनी समोर, म्हाळुंगे येथे घडली.

तान्हाजी मोघा सुपे (वय 20, रा. निघोजे, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याबाबत शेखर दामू मुंडे (वय 23, रा. निघोजे) यांनी शुक्रवारी (दि. 30) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ओंकार दत्तात्रय धनवे (रा. कर्वेनगर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालवत असलेली बस (एम एच 14 / सी डब्ल्यू 3704) भरधाव वेगात चालवून तान्हाजी चालवत असलेल्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये तान्हाजी गंभीर जखमी झाला. त्यातच तान्हाजीचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.