Pune : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात आज गुरुवारी दुपारी चार वाजता हडपसर सासवड रोडवरील भेकराईनगर येथे घडला. दोन महिन्यात तुकाई दर्शन ते मंतरवाडी फाटा या तीन किलोमीटर अंतरामध्ये चार जणांना अपघातांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे.

नवीन कुमार धरमसिंग नरगुंड (वय ४२ रा. हरपळे वस्ती फुरसुंगी) असे ठार झालेल्याचे नाव आहे.

अपघातानंतर डंपरचालक डंपर सोडून पळून गेला आहे. अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या भेकराईनगर येथील चौकाजवळ सासवडच्या दिशेने जाणाऱ्या डंपरचा धक्का दुचाकीस्वारास लागल्याने दुचाकीस्वाराचा तोल जाऊन तो डंपरच्या चाकाखाली आला. त्यामुळे डंपरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.