Pune : भरधाव पीएमपीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सिंहगड रस्त्यावर भीषण अपघात; 

एमपीसी न्यूज : भरधाव वेगाने जाणाऱ्या पीएमपी ने दुचाकीला दिलेल्या धडकेत ज्येष्ठ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील माणिक बाग जवळ आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. हा अपघात पाहण्यासाठी सकाळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. जयंत रामाजी महाडिक (वय 67) असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जयंत महाडिक हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. आज सकाळच्या सुमारास ते सिंहगड रस्त्याने दुचाकीने प्रवास करत होते. त्यांची दुचाकी माणिक बाग परिसरात आली असताना भरधाव वेगाने आलेल्या पीएमपीएमएल ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यानंतर जयंत महाडिक खाली पडले आणि पीएमपीएमएल चे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड रोड पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या संख्येने जमलेल्या गर्दीला त्यांनी पांगवत मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.