-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chakan News : भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या एका स्कॉर्पिओ कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 20) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास निघोजे येथे महिंद्रा इलेक्ट्रिकल कंपनीच्या गेट समोर घडली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

सागर मोहन राठोड (रा. बिजलीनगर, चिंचवड) असे स्कॉर्पिओ चालकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत पांडुरंग सौदागर देठे (वय 34, रा निघोजे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांडुरंग देठे हे महिंद्रा इलेक्ट्रिकल कंपनी येथे सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करतात. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास कंपनीच्या गेट समोरून एक दुचाकीस्वार (यु पी 32 / जे व्ही 8093) जात होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या स्कॉर्पिओ कारने (एम एच 14 / डी टी 8655) दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. ज्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता स्कॉर्पिओ कार चालक निघून गेला. या अपघातात  दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.