Pune News : हडपसरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज : भरधाव अवजड ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर परिसरात घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.

अरविंद रामचंद्र देशपांडे (वय ५३, रा. साईश्रद्धा पार्क, गोपाळपट्टी, मांजरी) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक कैलास उत्तम राठोड (वय ३०, रा. घागरा, ता. जिंतूर, जि. परभणी) याला अटक करण्यात आली आहे.  देवेंद्र अरविंद  देशपांडे (वय २३) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काल दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीस्वार अरविंद पुणे-सोलापूर रस्त्यावरुन निघाले होते.  त्यावेळी हडपसर भागात अवजड ट्रकने दुचाकीस्वार अरिंवद यांना धडक दिली.  त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या अरविंद यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.