Chakan News : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज : अज्ञात वाहनाने एका दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 14) सकाळी चाकण-शिक्रापूर रोडवर साबळेवाडी येथे घडला.

अविनाश बप्पासाहेब औटी (वय 25, रा. हापसेवस्ती चिंबळी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत अक्षय रोहिदास पडवळ (वय 25, रा. भुजबळआळी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अविनाश त्याच्या दुचाकीवरून (एम एच 14 / जी एम 5190) चाकण-शिक्रापूर रोडने जात होता. सकाळी साडेसात वाजता साबळेवाडी येथे त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. त्यात अविनाश गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालक अपघाताची माहिती न देता तसेच जखमी अविनाशला रुग्णालयात न नेता घटनास्थळावरून पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.