Chikhali : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

Two wheeler parked in front of house stolen from Chikhali area.

एमपीसी न्यूज – घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 8 जुलै रोजी कृष्णानगर, चिंचवड येथे उघडकीस आली. याबाबत 29 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुपम सिद्धार्थ मोरे (वय 29, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम एच 14 / ई एक्स 0030 ही दुचाकी 8 जुलै रोजी रात्री साडेबारा वाजता त्यांच्या घरासमोर असलेल्या सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला पार्क केली.

रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सकाळी सात वाजता उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.