Nigdi : कार्यालयासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

Two wheeler parked in front of Office was stolen.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कार्यालया समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 20 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता ट्रान्सपोर्टनगर निगडी येथे अगरवाल कॉम्प्लेक्स येथे उघडकीस आली.

नरेशकुमार ब्राम्हदत्त शर्मा (वय 47, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शर्मा यांनी त्यांची 22 हजार रुपये किमतीची एम एच 14 / ई के 3814 ही दुचाकी 19 जुलै रोजी रात्री दहा वाजता ट्रान्सपोर्टनगर निगडी येथील अगरवाल कॉम्प्लेक्सच्या कंपाउंडच्या आत पार्क केली.

अज्ञात चोरट्यांनी रात्री दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 20 जुलै रोजी सकाळी उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.