Bhosari : ट्रेलर अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

Two wheeler rider dies after coming under trailer.

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या एका ट्रेलरने मोपेड दुचाकीला मागून धडक दिली. त्यानंतर ट्रेलर दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेला. त्यामध्ये चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 26) रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर भोसरीकडून कासारवाडीकडे जाणा-या मार्गावर चंद्रदीप बिर्याणी हाउस जवळ भोसरी येथे झाला. पोलिसांनी आरोपी ट्रेलर चालकाला अटक केली आहे.

संतोष भास्कर दाते (वय 45, रा. शास्त्रीचौक, भोसरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी संतोष यांचा लहान भाऊ सचिन भास्कर दाते (वय 35) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी समाधान श्रीमंत दबडे (वय 26, रा. राजुरी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचा मयत भाऊ संतोष त्यांच्या मोपेड दुचाकीवरून (एम एच 14 / जी जे 0217) भोसरी कडून कासारवाडीच्या दिशेने जात होते.

ते चंद्रदीप बिर्याणी हाउस जवळ आले असता एका ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये संतोष खाली पडले. त्यानंतर ट्रेलर संतोष यांच्या अंगावरून गेला. त्याखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींनी कंटेनर चालक समाधान याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1