Wakad Crime News : भरधाव दुचाकी घसरून अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील दुचाकी घसरून पडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 24) रात्री सव्वादहाच्या सुमारास पुनावळे येथे झाला.

पारस छत्रारामजी सोलंकी (रा. पुनावळे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलीस हवालदार पराग जंगम यांनी या प्रकरणी रविवारी (दि. 26) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मयत पारस सोलंकी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारस सोलंकी शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. पुनावळे नदीच्या पुलाकडून पुनावळेकडे जाणाऱ्या महामार्गाच्या सेवा रस्त्यावर पारस सोलंकी यांची भरधाव दुचाकी घसरून पडली.

दरम्यान, यात गंभीर जखमी झालेल्या सोलंकी यांचा मृत्यू झाला तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. हा अपघात तसेच स्वतःच्या मृत्यूला जबाबदार ठरल्या प्रकरणी मयत पारस सोलंकी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.