Bhosari: सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी पळवली

Two-wheeler stolen from society's parking lot in bhosari अज्ञात चोरट्यांनी मोटे यांच्या दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली.

एमपीसी न्यूज- सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना 27 जून सकाळी साडेसात ते 28 जून सायंकाळी दहा या कालावधीत रामनगरी हाऊसिंग सोसायटी, शास्त्री चौक, भोसरी येथे घडली.

राजाराम पांडुरंग मोटे (वय 45, रा. रामनगरी हाऊसिंग सोसायटी, शास्त्री चौक, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोटे यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (एमएच 14 यु 6787) ही दुचाकी 27 जून रोजी सायंकाळी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती.

रात्री अज्ञात चोरट्यांनी मोटे यांच्या दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 28 जून रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आला. याबाबत तीन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like