Moshi : भर दिवसा दुकानासमोरून दुचाकी पळवली

Two wheeler stolen during daytime from Moshi.

एमपीसी न्यूज – भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या समोर पार्क केलेली दुचाकी चोरून नेली. ही घटना 31 जुलै रोजी सकाळी नऊ ते रात्री साडेनऊ या कालावधीत जुना आळंदी रोड, मोशी येथे समर्थ एन्टरप्रायजेस या दुकानासमोर घडली.

अजय गजानन अरबे (वय 29, रा. लक्ष्मीनगर, दिघी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची एम एच 14 / सी टी 8544 ही दुचाकी जुना आळंदी रोड, मोशी येथील समर्थ एन्टरप्रायजेस या दुकानाच्या समोर सकाळी नऊ वाजता लॉक करून पार्क केली.

रात्री साडेनऊ वाजता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.