Dehuroad : ‘टेस्ट ड्राईव्ह’च्या बहाण्याने दुचाकी लांबविली 

एमपीसी न्यूज – ‘ओएलएक्स’वर जाहिरात पाहून दुचाकी खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाने ‘टेस्ट ड्राईव्ह’चा बहाणा करत दुचाकी घेऊन पसार झाला. हा प्रकार देहूरोड येथे नुकताच घडला. 


याप्रकरणी अखिलेश रामंचद्र देवांगण (वय 32, रा. ब्लॉक लाईफ रिपब्लिक, मुळशी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अखिलेश यांनी दुचाकी विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. ही जाहिरात पाहून अखिलेश यांच्याशी आरोपी शुभमने संपर्क साधत दुचाकी विकत घेणार असल्याचे सांगितले.  दुचाकी घेण्यापुर्वी शुभमने टेस्ट ड्राईव्हचा बहाणा करत दुचाकी पळवून नेली. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.