Pimpri-Chinchwad : सराईत दुचाकी चोरांना अटक, 3 लाखांच्या सात दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने (Pimpri-Chinchwad) कारवाई करत तीन सराईत दुचाकी चोराला अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 3 लाख रुपायांच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत.  

 

प्रतिक उर्फ हायजॅक योगिराज खडसे (वय 24 रा.येरवडा), रमन मोहन ठाकुर (वय 22 रा.चिंचवड) व शुभम गंगाराम पिटेकर (वय 24 रा.मंचर) अशी अटक आरोपीचे नावे आहेत.

 

Chinchwad News : चिंचवडेनगर मध्ये भर दिवसा घरफोडी

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पिंपरी परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना खबर मिळाली की संत तुकाराम नगर येथे एक सराईत चोरटा दुचाकी चोरीसाठी येणार आहे. पोलिसांनी सापळा रचून खडसे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या तपासात खडसे याच्याकडून पिंपरी, आळंदी, लोणावळा व चाकण पोलीस ठाणेय येथे दाखल असलेले एकूण पाच गुन्हे उघडकीस आणत पाच दुचाकी जप्त केल्या. (Pimpri-Chinchwad)  तर दुसऱ्या कारवाईत पोलिसांनी रमन व शुभम यांना अटक करत त्यांच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत त्यांच्यावर हिंजवडी व मंचर येथे दुचाकी चोरीचे गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 3 लाख 10 हजार रुपायांच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत.

 

हि कारवाई दरोडा विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे, भरत गोसावी, सहाय पोलीस फौजदार महेश खाडे, पोलीस हवालदार नितीन लोखंडे, विक्रांत गायकवाड, उमेश पुलगाम , राहूल खारगे, आशिष बनकर, प्रवीण कांबळे,सागर शेडगे, गणेश कोकणे, अमर कदम, समीर रासकर, प्रविण माने यांच्या पथकाने केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.