Pune News : दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचा गंठण हिसकाविला

एमपीसी न्यूज : घराशेजारील रस्त्यावर नातवाला सायकलवर बसवून चालत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 4 तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून नेले.

_MPC_DIR_MPU_II

ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री साडेदहाच्या सुमारास वडगाव शेरीतील भारती कॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी माधुरी वसंत पाटील (वय 53) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दोन दिवसांपुर्वी रात्री सव्वा दहाच्या सुमारास माधुरी त्यांच्या नातवाला सायकलवर बसवून परिसरात फिरवत होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील 4 तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसका मारून तोडून नेले. माधुरी यांनी आरडा-ओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी चंदननगर पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.