Chikhali : कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मोपेड दुचाकीवरून जात असताना भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी आठच्या सुमारास रिव्हर रेसिडेन्सी सोसायटी जवळ घडली.

वेदा दीपक मुळे (वय 26) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रज्ञा अमर चौगुले या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी प्रशांत रत्नाकर मुळे (वय 26, रा. मोशी) यांनी चिखली पोलीस फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कारचालक रविकांत कृष्णप्रसाद राजू (रा. रिव्हर रेसिडेन्सी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत यांच्या भावाच्या पत्नी मयत वेदा त्यांची मैत्रीण प्रज्ञा यांच्यासोबत मोपेड दुचाकीवरून (एम एच 14 / जी बी 5635) कार्यक्रमासाठी जात होत्या. रिव्हर रेसिडेन्सी जवळ आल्यानंतर भरधाव वेगात आलेल्या कारने (एम एच 12 / क्यू एफ 5687) वेदा यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये वेदा यांच्या पायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांची मैत्रीण प्रज्ञा यांच्या डोक्याला व हाताला इजा झाली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.