BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

एमपीसी न्यूज – भरधाव एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.20) दुपारी दोनच्या सुमारास मोशीतील बनकर वस्ती येथे घडली.

सविता मुर्गाप्पा तुळजानवर (वय-34, रा. देहूफाटा), असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ स्वप्निल बाबासाहेब घुगरे (वय-29, रा. धनकवडी) यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसटी बसचा चालक सोपान बालकृष्ण पाटील (रा. कोपरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता शुक्रवारी दुपारी बनकर वस्ती येथून मोपेडवरून जात होत्या. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या (एमएच40, ए. क्यू 6009) या एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. यामुळे गंभीर जखमी झालेल्या सविता यांचा जागीच मृत्यू झाला. भोसरी, एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3