Pune News : भरधाव पीएमपीएमएलच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील विमानतळ परिसरात भरधाव पीएमपीएमएल बसणे दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. विमानतळ रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळ हा अपघात झाला आहे. आदेश पोपट कांबळे (वय 23, रा. इंदिरागनर, बर्माशेल, लोहगाव) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. 

याप्रकरणी अलका कांबळे (वय 48) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पीएमपीएमएल बसवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी महिलेचा मुलगा रविवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीने जात होता. त्यावेळी भरधाव पीएमपीएमएल बसने म्हसोबा चौकाजवळ त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने आदेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातस्थळी न थांबता बस चालक तेथून पसार झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक ए. आर. गंधाले करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.