Bhosari : पीएमटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या व्यक्तीला पीएमटी बसने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी येथील टेल्को रोडवर घडला.

बी एम ननावरे (पूर्ण नाव पत्ता समजू शकले नाही) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ननावरे भोसरी वरून निगडीच्या दिशेने होंडा शाईन या दुचाकीवरून जात होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास ते टेल्को रोडवरील कार्पोरेशन बँकेसमोर आले असता त्यांना पीएमटी बसने धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.