BNR-HDR-TOP-Mobile

Dehuroad : कंपनीतील लोखंडी स्क्रॅप चोरल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीमधून लोखंडी स्क्रॅप व तयार मटेरियल चोरी केल्याप्रकरणी दोन महिलांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 18)  देहूरोड येथे घडली.

चंद्रकला संतोष कांबळे (वय 29, रा. देहूगाव. मूळ रा. बिदर), मीना बापू घोलप (वय 30, रा. देहूगाव. मूळ रा. जालना) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी नानासाहेब अंबादास दरेकर (वय 40, रा. पूर्णानगर, पुणे. मूळ रा. श्रीगोंदा, अहमदनगर), यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड जवळ नानासाहेब यांची कंपनी आहे. या कंपनीत आरोपी महिला काम करतात. या महिलांनी बुधवारी (दि. 18) दुपारी पावणेएकच्या सुमारास कंपनीमधून लोखंडी स्क्रॅप आणि तयार मटेरियल असा एकूण 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3