Bhosari crime : जमिन खरेदी केली म्हणून शिवीगाळ करत मारहाण

एमपीसी न्यूज : जमीन का खरेदी केली म्हणून पाच जणांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने दोन महिला व ज्येष्ठ नागरिकाला मारहाण कऱण्यात आली आहे. (Bhosari crime) याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गोरखनाथ बाळासाहेब सस्ते (वय 39 रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विष्णू बाबूराव सस्ते (वय 55),शिवाजी बाबूराव सस्ते (वय 57),दिगंबर शिवाजी सस्ते (वय34),अक्षय ऊर्फ आकाश सस्ते (वय 26) व रविंद्र मारूती सस्ते (वय 45) सर्व राहणार मोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC News : मालमत्ता, उद्यानाच्या सुरक्षेसाठी कंत्राटी रखवालदारांची नेमणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी एका महिलेकडून मोशी येथील गट क्रमांक 244 मध्ये 15 गुंठे जमीन घेतली. याचाच राग मनात धरून तुम्ही ती जमीन का खरेदी केली म्हणून आरपींनी फिर्यादी यांचे वडील बाळासाहेब दशरथ सस्ते, फिर्यादी यांची पत्नी व बहिण यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.(Bhosari crime) यावेळी फिर्यादीच्या वहिलांना लाकडीकाठीने मारून तू जागा कशी खरेदी करतो म्हणून हातावर व छातीवर मारहाण करत जखमी केले.यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.