Dighi : बांधकाम साईटवर दगडमातीची भिंत अंगावर कोसळल्याने दोन कामगारांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवरील एका खड्ड्यात काम करत असताना खड्ड्याच्या बाजूची भिंत अंगावर कोसळून दोन कामगार ठार झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजता चऱ्होली (Dighi) येथील दाभाडे सरकार चौकाजवळ घडली.

Pune : जवानांच्या कुटुंबियांनी घेतला गायन-नृत्याविष्काराचा आनंद

शामसुंदर धर्मदेव शेख्वानिया (वय 48, रा. उत्तर प्रदेश), सुरेंद्रकुमार रॉय (वय 39, रा. झारखंड) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप कांबळे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ब्लिस कौंटी, एस बी पाटील ग्रुपचे विकसक व सदर साईटचे सुपरवायझर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शामसुंदर आणि सुरेंद्रकुमार हे कामगार ब्लिस कौंटी, एस बी पाटील ग्रुप या बांधकाम साईटवर खड्ड्यात बांधकाम संबंधी काम करत होते. त्यावेळी खड्ड्याच्या बाजूला असलेली दगडमातीची भिंत खड्ड्यात कोसळली. त्यामध्ये गाडले जाऊन दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी (Dighi) पोलीस तपास करीत आहेत.

Mahalunge : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.