Pune News : खेळता-खेळता वाट चुकलेला दोन वर्षाचा चिमुरडा अखेर आईच्या कुशीत

एमपीसी न्यूज : रविवारी दुपारच्या सुमारास नाना पेठेतील एका रस्त्यावर दोन वर्षाचा मुलगा मोठमोठ्याने रडत आणि काहीतरी शोधत फिरत असल्याचे एका महिलेला दिसले. तिने त्या मुलाला घेऊन नाना पेठ पोलिस चौकी गाठली. मुलगा मात्र अजूनही रडत होता आणि त्याचे बोलणे काही कुणाला कळत नव्हते

अखिल समर्थ पोलिसांनी याची मुलाचे फोटो वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवले आणि बीट मार्शल च्या मदतीने समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलीस या मुलाच्या पालकाच्या शोधात असतानाच अल्पना चित्रपटगृहाजवळ एक महिला रडत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने आपली आपले मूल हरवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला पोलिस ठाण्यात नेले तेव्हा आईला पाहून क्षणात त्या ठिकाणी असणाऱ्या चिमुरद्याने तिच्याकडे धाव घेतली.

पुण्यातील धायरी परिसरात राहणाऱ्या शाहीन सय्यद या त्यांच्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन नाना पेठेत नातेवाईकांकडे आल्या होत्या. यावेळी त्यांचा दोन वर्षाचा मुलगा घराबाहेर खेळत असताना चालत दुसरीकडे गेला आणि हरवला. त्यामुळे हा मुलगा रडत व आईला शोधत रस्त्याच्या कडेने जात होता. येथून जाणाऱ्या एका महिलेने त्या मुलाला पाहिले आणि तिने त्याला घेऊन थेट समर्थ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नाना पेठ पोलीस चौकीत आणले. घडलेला सर्व प्रकार ही पोलिसांना सांगितला.

त्यानंतर समर्थ पोलिसांनी नाना पेठेतील मासळी आळी, भाजी मंडई, धान्य मार्केट, अशोक चौक येथे शोध घेतला आणि या मुलाला त्याची आई परत मिळवून दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.