Pune : मनसेच्या महामोर्च्यासाठी पुण्यात शनिवारी ५००० युवकांची ‘राजगर्जना’ दुचाकी रॅली

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ९ फेब्रुवारीच्या मोर्चासाठी अंदाजे ५००० हजार दुचाकी गाड्यांची ‘राजगर्जना’ रॅली शनिवारी (दि. 8 फेब्रुवारी) सकाळी ११.०० वा निघणार आहे.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्यासाठी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन व मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन हा मूळ उद्देश या रॅलीच्या आयोजनामागे आहे. ही रॅली ससून हॉस्पिटलपासून चालू होऊन, जिल्हाधिकारी कार्यालय, नरपतगिरी चौक, एमएसीबी चौक, नाना पेठ,चाचा हलवाई चौक, अल्पना टॉकीज, हमजेखान चौक, सोन्या मारुती चौक, समाधान चौक, दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून अलका टॉकीज, फर्ग्युसन कॉलेज रस्त्याने संचेती हॉस्पिटल शिवाजी महाराज पुतळा एसएसपीएमएस इथे समाप्त होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.