Pune News : कोंढव्यात टोळक्याकडून दोन तरूणांवर वार

एमपीसी न्यूज : कारण नसतानाही चौघांच्या टोळक्याने दोघा तरूणावर वार करून जखमी केल्याची घटना दोन दिवसांपुर्वी कोंढव्यातील खडीमशीन चौक परिसरात घडली आहे. याप्रकरणी मंगेश यादव (वय २६, रा. कोंढवा बुद्रुक ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश आणि त्यांचा मित्र आमिन पानसरे २६ फेब्रुवारीला रात्री साडेदहाच्या सुमारास पानटपरीवर गेले होते. त्यावेळी तेथील एका मोकळ्या मैदानात काही जणांची भांडणे सुरू होते. त्यातील चौघाजणांनी काहीही कारण नसताना आमिन पानसरेच्या डोक्यात शस्त्राने वार करून जखमी केले. त्यानंतर मंगेशच्या पायावर वार केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बर्गे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.