Kiwale News: किवळे येथे गांजा विक्री करणाऱ्या दोन तरुणांना अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्री प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 30) किवळे येथे करण्यात आली.

अविनाश भाऊ आव्हाड (वय 23, रा. देहूरोड), गणेश रवींद्र जाधव (वय 23, रा. देहूरोड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह साथीदार चिक्या (पूर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अजित कुटे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri Chinchwad : राजस्थानमधून आणून मुकाईनगर येथे पॉपी स्ट्रॉ विक्री करणाऱ्यास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी मुकाई चौक किवळे येथे दोघेजण गांजा विक्रीसाठी आले असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अविनाश आणि गणेश या दोघांना गांजासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 780 ग्रॅम वजनाचा गांजा, रोख रक्कम, लोखंडी चॉपर, दोन मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा 86 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.