Pune News : पुण्याच्या कर्वेनगरमध्ये दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील कर्वेनगर परिसरात असणाऱ्या उड्डाणपुलावर भरधाव दुचाकीच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. शंकर इंगळे (वय 27) आणि सलील इस्माईल कोकरे (वय 20) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्रीच्या सुमारास शंकर आणि सलील हे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते. भरधाव वेगाने जात असताना कर्वेनगर उड्डाणपुलाच्या वळणावर दुचाकीवरचे  त्याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली.

हा अपघात इतका भीषण होता की दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.