Pimpri News: ‘धन्वंतरी’ योजनेसाठी महापालिका कर्मचा-यांचे लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, महासंघाचा विरोध डावलून कर्मचारी हिताची बंद केलेली ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना चालू ठेवावी या मागणीसाठी महासंघाने उपोषण सुरु केले आहे. महापालिकेची आज (बुधवारी) सर्वसाधारण सभा आहे. सभेच्या विषयपत्रिकेवर विम्या पॉलिसीसाठी तरतूद वर्गीकरणाचा विषय आहे. त्यापार्श्वभूमीवर महासंघ, कर्मचारी आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहे.

_MPC_DIR_MPU_II


महापालिकेच्या आऊट गेटसोमर पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरु आहे. यामध्ये महासंघाच्या सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे यांच्यासह संघाचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

महापालिका सेवेतील, सेवानिवृत्त कर्मचा-यांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ ही वैद्यकीय योजना 1 सप्टेंबर 2015 पासून लागू करण्यात आली होती. ही योजना कर्मचारी हिताची होती. परंतु, कर्मचारी, महासंघाचा विरोध डावलून प्रशासनाने महापालिका सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्यावर अवलंबितांसाठी ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजनेऐवजी 4 जानेवारी पासून वैद्यकीय विमा योजना लागू केली आहे. परंतु, विमा योजनेला कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे.  ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना कर्मचारी हिताची आहे. ही योजना कायम ठेवावी अशी कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी आज लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. ‘धन्वंतरी आमच्या हक्काची, ‘आता अन्याय नाही न्याय हवा’ असा मजकूर असलेले फलक लावण्यात आले आहेत.

दि न्यु इंडिया एशोरंन्स कंपनी लि. यांना त्याचे काम देण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना प्रिमियमचा 25 टक्के म्हणजेच 6 कोटी 96 लाख 19 हजार 652 रुपयांचा पहिला हप्ता तत्काळ देण्यात येणार आहे. तसेच 31 जानेवारी 2021 रोजी दुसरा हप्ता दिला जाणार आहे. त्यासाठी तरतूद वर्गीकरणाचा विषय महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ‘धन्वंतरी स्वास्थ’ योजना पुढील सुनावणीपर्यंत बंद करू नये असा आदेश औद्योगिक न्यायालयाने महापालिकेला दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.