Pune News: उदयनराजे हतबल होऊच शकत नाहीत, त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोचल्या – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण सुरू आहे. इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या अशा व्यक्तींविरोधात कुठलीही कारवाई केली जात नाही असे म्हणत भाजप नेते उदयनराजे भोसले चांगलेच उद्विग्न झाले होते. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू ही आले होते. राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या विधानानंतर उदयनराजे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचले आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत ते हतबल होऊ शकत नाहीत. ते भावनिक होऊन बोलले असले तरी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत असं म्हणत त्यांनी उदयनराजे यांच्या भावना योग्य त्या ठिकाणी पोहोचल्या असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस सोमवारी पुण्यात होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.

Pimpri News: …तरच खऱ्या अर्थाने सकारात्मक सामाजिक क्रांती साधता येईल

फडणवीस म्हणाले राज्यपालांच्या संदर्भात अधिकार राष्ट्रपतींना आहेत. राज्यपालांची नियुक्ती सरकार नाही तर राष्ट्रपती करतात. त्यामुळे सरकार यामध्ये काहीही करू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेक्षा मोठा प्रेरणास्त्रोत कोणीच असू शकत नाही आणि आमच्या सर्वांचे ते आदर्श आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.