सोमवार, डिसेंबर 5, 2022

Uddhav Thackeray : सामनाच्या संपादकपदी पुन्हा उध्दव ठाकरे

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादक पदाची धुरा उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शुक्रवारी स्विकारली. गेल्या आठवड्यात सक्तवसुली संचनालयाने संजय राऊत यांना अटक केल्यानंतर सामनाची जबाबदारी उध्दव ठाकरे यांनी स्वत:कडे घेतली आहे.वृत्तपत्राच्या प्रिंट लाइनमध्ये (Uddhav Thackeray) आज तसा बदल करीत उध्दव ठाकरे यांचे नाव संपादक म्हणून छापण्यात आले आहे.

 

 

महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये झालेल्या सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिला होता. मार्च 2020 मध्ये उध्दव ठाकरे यांनी हे पद त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपविले होते. मात्र आता सत्तेतून पायउतार झाल्यावर महिन्याभरानंतर उध्दव (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत असतील.

 

 

उध्दव यांनी सामनाचा कारभार हाती घेतल्यानंतर आता ते वृत्तपत्राच्या माध्यमातून शिंदे सरकारला लक्ष्य करतील का हे आगामी काळातच स्पष्ट होईल. संजय राऊत यांना अटक करण्यात आल्यानंतर वृत्तपत्रातील अग्रलेख आणि रोखठोकसारख्या सदरांसंदर्भात चर्चांना सुरुवात झाली होती.संजय राऊत यांनी न्यायालयाकडे अग्रलेख लिहीण्याची परवानगी मागितली होती. मात्र ती नाकरण्यात आली.या सर्व पार्श्वभूमीवर उध्दव यांनी वृत्तपत्राची धुरा हाती घेतल्याचे समजते.

 

 

Latest news
Related news